आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंना ब्लड कॅन्सर:दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू; कुटुंबियांचे डिस्टर्ब न करण्याचे आवाहन

नागपूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रसिद्ध समाज सेवक प्रकाश आमटे यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सरचे निदान झाले. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरूयत.

न्यूमोनियावर उपचार सुरू

प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरसोबतच न्यूमोनियाच्या संसर्गामुळे गेल्या 10 दिवसांपासून खूप ताप आहे. पुणे येथील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाहते तसेच लोकांनी फोन करून डिस्टर्ब न करण्याची विनंती मुलगा अनिकेत व कुटुंबीयांनी केली आहे. सध्या त्यांच्यावर न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. येत्या 2 किंवा 3 आठवड्यांनंतर, शरीराची ताकद वाढल्यानंतर रक्त कर्करोगाचा उपचार सुरू होऊ शकतो.

दुर्मीळ रक्ताचा आजार आहे

केसाळ पेशी ल्युकेमिया हा रक्ताचा एक दुर्मीळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. यामध्ये अस्थिमज्जा खूप जास्त म्हणजे अतिरिक्त पांढऱ्या पेशींची निर्मिती (लिम्फोसाइट्स) करते. एरव्ही या पांढऱ्या पेशी म्हणजे सैनिक पेशी शरीरातील रोगजंतुशी लढतात. पण, अतिरिक्त निर्मितीमुळे रोग प्रतिकारक यंत्रणेत त्या तारक ऐवजी मारक ठरतात. या अतिरिक्त पांढऱ्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली केसासारख्या दिसतात.

ही आहेत लक्षणे

सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, विनाकारण वजन कमी होणे, धाप लागणे, जास्त घाम येणे, अनेकदा रात्री, सुजलेल्या लिम्फ नोड्स, वारंवार संक्रमण आणि ताप, त्वचेवर लहान लाल ठिपके, वाढलेले यकृत किंवा प्लीहा, सोपे जखम आणि रक्तस्त्राव, हाडांचे दुखणे, विशेषत: बरगड्यांच्या खाली.

पूर्वी कोरोनाची लागण

डॉ. प्रकाश आमटे यांना फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

प्रकाश आमटे यांच्याविषयी...

डॉ. प्रकाश आमटे हे समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचे काम डॉ. प्रकाश आमटे पाहतात. भारत सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्काराने डॉ. प्रकाश आमटे यांचा गौरव झाला आहे. तसेच, रॅमन मॅगसेसे, मदर तेरेसा अवॉर्ड्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले आहे. 'प्रकाशवाटा' ही डॉ. प्रकाश आमटे यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. मराठी, इंग्रजी, गुजराती, कन्नड अशा भाषांमध्ये ही आत्मकथा अनुवादित झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...