आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाडी लगत लाव्हा गांवात सोनबा बाबा उत्सव भाविकांच्या अफाट गर्दीत साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर होक रे होकच्या गजराने दुमदुमून गेला. स्थानिक सोनबा बाबा उत्सव समितीच्या वतीने मागील अडीचशे वर्षांपासून या पारंपरिक यात्रेचे आयोजन करण्यात आले.या गांवातील मुली आवर्जून या कार्यक्रमाला माहेरी येतात. यामुळे दिवाळी पेक्षाही या उत्सवाला महत्त्व दिले जाते. बैलांशिवाय बंड्या चालविण्याची ही परंपरा स्थानिक गोरले परिवारांतर्फे जोपासली जात आहे.
लावा येथे पुरातन सोनबा बाबाचे मंदिर असून होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला मंदिरात घट स्थापन केली जाते. मागील कित्येक वर्षांपासून वयोवृद्ध माधवराव गोरले ही परंपरा चालवीत होते. परंतु वृद्धपकाळाने मागील दोन वर्षापासून उत्तराधिकारी जीवन उर्फ कोकाजी गोरले यांनी ही जबाबदारी सांभाळली. शुक्रवारी चतुर्थीच्या दिवशी मध्यरात्री लावा आणि सोनबा नगर सीमेवर असलेल्या सोनबा बाबा मंदिरात विधीवत पूजा व महाआरती करण्यात आली. मागील परंपरेनुसार शनिवारी रंगपंचमीला पाच बैलगाड्या एकत्र बांधून सुरुवातीच्या पहिल्या बैलगाडीवर कोकाजी गोरले बाबा स्वतः आपल्या 100 ते 150 भक्तासह उभे राहून "होक रे होक' व "सोनबा बाबा की जय' अशा गगनभेदी गर्जना देताच बैलाशिवाय बंड्या चालायला लागल्या हे दृश्य व चमत्कार पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
या ठिकाणी साईनाथ ब्लड बँक सक्करधरा नागपूर कडून रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले. यात डॉ. अनिल ढोणे व सहकर्मी लक्ष्मण गणेशे, संदेश गौर, आशा देशमुख, संजय देशमुख यांची उपस्थिती होती.
ही यात्रा यशस्वी करण्यासाठी कोकाजी गोरले भगत, गणेश पटेल हिरनवार, माजी जि. प. उपसभापती सुजित नितनवरे, लाव्हा सरपंच ज्योत्सना नितनवरे, उपसरपंच रॉबीन शेलारे, सदस्य रामेश्वर ढवळे, साधना वानखेडे, पूजा तभाने, सुनंदा चोखांद्रे, जीतेश पीडेकर, आकास पवार, कपील खडसे, धनवंती भीवणकर ,माजी उपसरपंच महेश चोखांद्रे, पांडूरंग बोरकर ,व नितीन गोरले , शेषराव गोरले , देवनाथ गोरले , मोरेश्वर गोरले , मंगेश खोरगडे , रोहन वानखेडे , मोरश्वर वरठी , अशोक वानखेडे , मदादेव वानखेडे, सुरेश ढवळे, दतुजी पैठणकर, दतुजी वानखेडे, प्रकास डवरे, मंगेश चोखांद्रे, पिंटू आगरकर , विलास ढोणे , यादव इंगळे व गावकरी यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.