आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेत तोंड भाजले, आता ताकही फुंकून पिणार:विधान परिषद निवडणुकीसाठी मविआची सावध भूमिका, मंत्री वडेट्टीवारांची माहिती

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीपासून भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाची चटक लागली आहे. पण, विधान परिषद निवडणुकीत तसे होणार नाही. राज्यसभा निवडणुकीत तोंड भाजल्यामुळे विधान परिषद निवडणुकीत ताकही फुंकून पिणार, अशी सावध भूमिका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मांडली.

भाजपचा विजय तांत्रिक कारणामुळे

राज्यसभेतील भाजपचा विजय तांत्रिक कारणामुळे हाेता. तो विजय संख्याबळानुसार झाला नाही. तरीही विजय हा विजयच असतो, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. राज्यसभा निवडणुकीच्या अनुभवामुळे विधान परिषद निवडणुकीत आम्ही सावध आहोत. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व सहा उमेदवार निवडून येतील, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

शाळांबाबत 15 दिवसांनी आढावा

राज्यासह देशभरात सध्या काेराेना रुग्णांची वाढ होताना दिसत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. नवीन व्हेरीएंटचे रुग्णही कमी आहेत. त्यामुळे सध्या तरी कोणतेही नवीन निर्बंध लादणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत खूप शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे राज्यभरातील शाळा सुरु करण्यात येतील. पंधरा दिवसानंतर त्याचा आढावा घेण्यात येईल, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...