आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:आरक्षण हा आता केवळ राजकारणाचा विषय झाला आहे; गडकरी यांची खंत

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशात प्रत्येकाला नोकरी हवी असते. चौकटीबाहेरचा विचार कुणी करत नाही, समजून घेत नाही. मुळात सरकारी नोकऱ्याच नाहीत तर त्यात आरक्षण कुठून देणार? आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय झाला आहे. आपल्याकडच्या राजकारण्यांची दृष्टीच वेगळी आहे. मागास असणे ही पूर्णपणे राजकीय बाब झाली आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात व्यक्त केले.

वनराई फाउंडेशनच्या वतीने कमानी ट्यूब्जच्या अध्यक्षा पद्मश्री कल्पना सरोज यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी गडकरी म्हणाले, तंत्रज्ञानामुळे रोजगार व पैसा मिळतो. येणारा काळ हा ड्रोन तंत्रज्ञानाचा आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणारा उद्योजक होऊ शकतो आणि त्याचा कोणत्याही जात, पंथ, धर्म, भाषेशी संबंध नाही. व्यक्तीच्या चांगुलपणाचा व गुणवत्तेचा कशाशी संबंध नाही. आपल्याकडे महाविद्यालये आहेत, पण उद्योजकता शिकवणाऱ्या संस्था नाहीत. प्रत्येकाला शाळा किंवा कॉलेज हवे हसते. दुसरा व्यवसाय करण्याची तयारी नसते. डॉ. सरोज यांच्यासारख्या यशस्वी उद्योजिकेने दलित समाजातील १०० तरुणींना उद्योजक म्हणून घडवावे. अशा प्रयत्नांतूनच आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित होईल, असेही गडकरी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...