आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:आता अपघातग्रस्तांना मदत केल्यावर मिळेल रिवॉर्ड, 'हायवे मृत्युंजय दूत' योजनेचा आज राज्यात शुभारंभ

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • . या योजनेचा शुभारंभ उद्या सोमवार, १ मार्च रोजी संपूर्ण राज्यात होत आहे.

हायवेवर वा अन्यत्र कुठे अपघात झाला की लोक मदतीसाठी पुढे येत नाहीत. कारण मागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमीरा लागतो. कुठून दुर्बुद्धी सुचली अन मदत केली, असे मदतीला धावून जाणाऱ्याला वाटते. पण, यापुढे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांच्या मागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमीरा लागणार तर नाहीच. उलट त्यांना रिवाॅर्ड मिळेल. कारण आता "हायवे मृत्युंजय दूत' योजना आली आहे. या योजनेचा शुभारंभ उद्या सोमवार, १ मार्च रोजी संपूर्ण राज्यात होत आहे.

"हायवे मृत्युंजय दूत' ही अतिरिक्त पोलिस महासंचालक व नागपुरचे माजी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची संकल्पना आहे. अपघातातील जखमींना पहिल्या तास दीड तासात म्हणजे "गोल्डन हवर'मध्ये तातडीने योग्य उपचार मिळून त्यांचा जीव वाचावा हा यामागे उद्देश असून महामार्गावर नेहमी कार्यरत असलेले सामान्य नागरिक यांना "मृत्युंजय दूत' म्हणून सहभागी केले जाणार आहे. नागपूर प्रादेशिक महामार्ग विभागातंर्गत येणाऱ्या सर्व १६ महामार्ग पोलिस केंद्र येथे "मृत्युंजय दूत' योजनेला प्रारंभ होत आहे. या योजनेत जास्तीतजास्त नागरिकांनी "मृत्युंजय दूत' म्हणून नावे नोंदवून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक श्वेता खेडकर यांनी केले आहे.

रितसर प्रशिक्षण देणार
हायवे लगत अनेक पानठेलेवाले, ढाबेवाले, टायर रिमोल्डींग तसेच लहान मोठे व्यवसाय करणारे लहान िवक्रेते असतात. कोणताही अपघात सर्वप्रथम हे पाहतात. तेव्हा सर्वप्रथम या विक्रेत्यांना "मृत्युंजय दूत' होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. निवड झाल्यानंतर त्यांना रितसर प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांना स्ट्रेचर तसेच प्रथमोपचार पेटी दिली जाईल. अशा चार पाच "मृत्युंजय दूत' यांचा एक गट तयार करून त्यांच्याकडे संबंधित केंद्रापासूनच्या किमान पाच सहा गावांची जबाबदारी देण्यात येईल, त्यांना पोलिस विभागाकडून "मृत्युंजय दूत' असे ओळखपत्र दिले जाईल, अशी माहिती खेडकर यांनी दिली. अपघातस्थळापासून जवळचे दवाखाने, पोलिस ठाणे याची माहिती व सर्व सर्वसंबंधितांचे मोबाईल क्रमांकही दिले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...