आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:पाकिस्तानला पाठवले होते संघाच्या मुख्यालयाचे फोटो, रेकी प्रकरणात नागपूर पोलिसांची माहिती

नागपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहंमदच्या दहशतवाद्याने त्या परिसरातील काही फोटो पाकिस्तानमधील आपल्या म्होरक्याला पाठवले होते. मात्र ते फोटो फार लांबून घेण्यात आले होते, तसेच ते स्पष्ट नव्हते अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली. लवकरच या दहशतवाद्याला नागपूर पोलिस ताब्यात घेणार असल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

कडेकोट सुरक्षेमुळे या दहशतवाद्याला संघाच्या महाल येथील मुख्यालयापर्यंत जाता आले नाही. त्याच्याविरुद्ध यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नागपुरात कोणीही मदत केली नव्हती असा दावा नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे. तसेच लवकरच या दहशतवाद्याला नागपूर पोलिस ताब्यात घेईल, असेही त्यांनी सांगितले. संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बँकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची जैशकडून रेकी केल्याचा धक्कादायक माहिती ७ जानेवारी रोजी समोर आली होती.

बातम्या आणखी आहेत...