आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवार 19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3.30 वाजता निधन झाले.
परखड मतांसाठी मा. गो. वैद्य यांना ओळखले जात होते. ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते. आज दुपारी 3.30 वाजता मा. गो. वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते. यामुळे त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22 येथून निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.
मनमोहन वैद्य यांनी ट्विट करत दिली माहिती
Shri M. G. Vaidya, my father breathed his last today at 3.35pm at Nagpur after completing 97 years of active, meaningful and inspiring life. He was a veteran journalist, a Hndutva "Bhashyakar" and active Sangh (RSS) Swayamsevak for 9 decades. pic.twitter.com/Gp6QPMsabW
— Dr. Manmohan Vaidya (@ManmohanVaidya) December 19, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.