आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर मोहन भागवत यांना नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांना लगेच चाचणी केली आणि रुग्णालयात दाखल झाले.
मोहन भागवत यांना कोरोना झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विट केले आहे. माझी मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो'
तर नितीन गडकरी म्हणाले की, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरनीय डॉ. मोहनजी भागवत हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो', असे ट्विट गडकरींनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.