आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बलराम व रुद्र या दोन नर वाघांमध्ये सोमवारी झुंज रंगली. हद्दनिश्चिती नि त्या भागातील माया नावाच्या वाघिणीला आपलेसे करण्यासाठी हे दोघे भिडले. अभयारण्यातील कोअर एरिया असलेल्या ताडोबा तलावाजवळील पांढरपैनी भागात दुपारच्या दरम्यान ही झुंज सुरू झाली. यापूर्वी देखील रुद्राने बलराम यास हुसकावून लावले होते. त्यावेळी जखमी झालेला बलराम तेथील माया वाघीण व परिसर जिंकण्यासाठी पुन्हा आला होता.
मानव व वाघांत संघर्ष वाढला
सद्य:स्थितीत अभयारण्यात ८५ ते ८८ वाघ असून त्यांची संख्या वाढत अाहे. कोअर एरियासोबतच लोकवस्तीजवळ बफर क्षेत्रामध्ये त्यांचा वावर वाढला आहे. हद्दनिश्चितीवरून वाघांमध्ये लढाईसोबतच मानव व वाघ यांच्यातील संघर्ष ही ताडोबा अभयारण्य व्यवस्थापनासमोरील नवी समस्या आहे. रुद्र - बलराम यांच्या झुंजीवेळी डरकाळ्यांमुळे जंगलातील इतर प्राण्यांत घबराट निर्माण झाली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.