आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन वार्ता:रुपी चिन्हाचे निवडकर्ते, माजी कला संचालक प्रा. हेमंत नागदिवे यांचे कर्करोगाने निधन

नागपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“रुपी’चे एक निवडकर्ते, राज्याच्या कला संचालनालयाचे माजी कला संचालक, जे. जे. स्कूल आॅफ आर्टचे माजी अधिष्ठाता प्रा. हेमंत नागदिवे यांचे बुधवारी (१५ जून) कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पत्नीचे २०२० मध्ये कोरोनाने निधन झाले होते. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

“रुपी’ या रुपयाच्या प्रातिनिधिक चिन्ह निवड समितीवर तज्ज्ञ सदस्य म्हणून रिझर्व्ह बँकेने त्यांची निवड केली होती. उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता वैशालीनगर निर्वाण घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. साहित्य क्षेत्राशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध हाेता. १९७६ साली नागपूर येथे झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात दलित चित्रकला प्रदर्शनाच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांच्या कलात्मक कॅलिग्राफीने सजली होती. नागपुरातील “मुक्तिवाहिनी’शी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांचे कलाविषयक चिंतन पुस्तकरूपात येण्याचे आता राहून गेले आहे. नागपूरच्या सौंदर्यीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

बातम्या आणखी आहेत...