आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांद्रयान-3 मोहीमेची तयारी पूर्ण:2023 च्या शेवटी मानवरहित अंतराळयानाचे प्रक्षेपण, डाॅ. एस. सोमनाथ यांची माहिती

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात गगनयान मिशनची घोषणा केली होती. आणि 2022 मध्ये ते साध्य करण्याचे तात्पुरते लक्ष्य होते. तथापि, कोरोना महामारीमुळे विलंब झाला. तथापि पहिले मानव रहित अंतराळयानाचे प्रक्षेपण 2023 च्या शेवटी होईल अशी माहिती इस्राेचे अध्यक्ष डाॅ. एस. सोमनाथ यांनी पत्रपरिषदेत दिली.

भारताच्या अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येईल, अशी माहितीही डाॅ. एस. सोमनाथ यांनी दिली. फेब्रुवारी 2022 मध्ये अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा झाल्यानंतर, अंतराळ विभागाने त्यावर काम केले. आता हा मसुदा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. हे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाकडे जाण्यापूर्वी पीएमओ संबंधित विभाग आणि मंत्रालयांशी सल्लामसलत करील असे सोमनाथ यांनी सांगितले.

चांद्रयान-3 चे काम वेगाने

चांद्रयान-3 मोहीमेची तयारी पूर्ण झाली असून सेफ लॅण्डींगवर आमचा भर राहाणार आहे असे सोमनाथ यांनी सांगितले. चांद्रयान-३ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. चांद्रयान-1 आणि दोननंतर इस्रो लवकरच चांद्रयान-3 लाँच करणार आहे. चांद्रयान-3 चे काम वेगाने सुरू आहे.

ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही

भूतकाळातील उणिवांपासून धडा घेत भारताचे शास्त्रज्ञ चांद्रयान-3 मोहिमेत परिश्रमपूर्वक काम करत आहेत. चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चांद्रयान-3 मिशनमध्ये वापरला जाईल. ते खूप फायदेशीर ठरेल. चांद्रयान-3 अगदी चांद्रयान-2 सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. कारण चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून यासाठी मदत घेण्यात येणार आहे असे सोमनाथ यांनी सांगितले.

खासगी सहभागावर भर

सोमनाथ म्हणाले की नवीन धोरणामध्ये अंतराळातील व्यावसायिक खासगी सहभागावर भर राहाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) संशोधन आणि विकास आणि क्षमता विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. भारतीय अंतराळ क्षेत्रात खाजगी संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रोचा प्रयत्न राहाणार आहे. अनेक भारतीय खाजगी कंपन्या आणि स्टार्ट-अप्स अंतराळ सहभाग सेवा आणि देण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. केंद्र सरकार यासाठी अनुकूल आहे.

भूमिअधिग्रहण बाकी

खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याने भारतीय अंतराळ कार्यक्रम जागतिक अंतराळ बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यास सक्षम होईल आणि त्यामुळे अवकाश आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण होतील असे सोमनाथ यांनी सांगितले. बंगळुरू येथे इस्राेच्या दुसऱ्या प्रक्षेपण केंद्राच्या बांधकामाचा आराखडा पूर्ण झालेला आहे. फक्त भूमिअधिग्रहण राहिले आहे. तेवढे झाले की लगेचच बांधकाम सुरू केले जाईल असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...