आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्‍तार्पण सोहळा:सद्गुरूदास महाराजांना ‘धर्मभास्‍कर’ सन्‍मान जाहीर, उपासना व धर्म प्रसाराच्या कार्याचा गौरव

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सद्गुरूदास महाराजांना संकेश्‍वर करवीर पीठाच्‍यावतीने दिला जाणारा ‘धर्मभास्‍कर’ सन्‍मान जाहीर झाला आहे. संकेश्‍वर करवीर पीठाचे मठाधिपती शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती स्‍वामी यांनी तेलंगणा राज्‍यातील गोदावरी तिरी वसलेल्‍या बासर येथे श्रीनृसिंह सरस्‍वती सायंदेव देवस्‍थानच्‍या भक्‍तार्पण सोहळ्यात या सन्‍मानाची घोषणा केली.

श्री सद्गुरूदास हे श्रीदत्त संप्रदायातील थोर योगी ब्रह्मलीन श्री विष्णुदास महाराज यांचे अनुग्रहित शिष्य असून त्‍यांनी सद्गुरूंकडून विधिवत अनुग्रह प्राप्‍त केला आहे. विष्‍णुदास महाराज समाधिस्‍थ झाल्‍यानंतर ‘शिवकथाकार’ म्‍हणून जनमानसात सुपरिचित असलेल्‍या विजयराव देशमुख यांचे ‘सद्गुरूदास विजयराव’ असे नामकरण करण्‍यात आले होते. मागील 60 वर्षांपासून उपासना व धर्म प्रसाराच्‍या कार्याचा गौरव म्‍हणून त्‍यांना ‘धर्मभास्‍कर’ हा सन्‍मान बहाल करण्‍यात येणार आहे.

सद्गुरूदास महाराज, श्रीगुरुमंदिर नागपूर यांच्‍या मार्गदर्शनानुसार बासर येथे सुरू असलेल्‍या चार दिवसीय सोहळ्याच्‍या तिसऱ्या दिवशी, मंगळवारी सद्गुरूदास महाराजांचा सहस्त्रचंद्र दर्शन विधी व पंचधातुंनी तुला करण्‍यात आली. देशभरातून बासर येथे आलेल्‍या हजारो भक्तांच्‍या साक्षीने सद्गुरूदास महाराजांचे पूजन करण्‍यात आले. नूतन सायंदेव आणि श्रीनृसिम्ह सरस्वती स्वामी देवस्थानला उपयुक्त वस्तू अर्पण करण्यात आल्या. याप्रसंगी कंपाली पीठाधीश पूज्यपाद श्रीनारायण विद्याभारती स्वामी, संकेश्वर पीठाधीश पूज्यपाद श्री विद्या नृसिम्ह भारती स्वामी, हिमालयीन योगी श्रीसदानंद गिरीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...