आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नागपूर:संभाजीराजे यांनी माझे वाक्य तोडून सांगितले : पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार

नागपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास वडेट्टीवारांचा विरोध नाही, हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे वक्तव्य म्हणजे आपल्या वक्तव्याचा विपर्यास असल्याचे सांगून मराठा समाजाला ओबीसींमध्ये यायचे असेल तर १२ टक्के आरक्षणाचा स्वतंत्र संवर्ग तयार करून सहभागी व्हावे असे आपण म्हणालो होतो. संभाजीराजेंनी माझे वाक्य तोडून सांगितले, अशा शब्दात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संभाजीराजेंवर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वडेट्टीवार माझ्या शेजारी बसले होते. त्यावेळी खासगीत बोलताना त्यांनी मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ केल्याचा दावा भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. यामुळे निर्माण झालेल्या वादावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, संभाजीराजे यांच्याशी जे बोललो त्याचा त्यांनी विपर्यास केला आहे. मी ओबीसी समाजाचा आवाज बुलंद करण्याचे काम करीत असल्याने मला राजकीयदृष्ट्या हलाल करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ओबीसी समाजाच्या मनात माझ्या विषयी गैरसमज निर्माण करून माझा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.