आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे वक्तव्य केल्याने सत्ताधाऱ्यांनी त्यांना जोरदार लक्ष्य केले होते. बुधवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी पवार आपल्या मतावर ठाम राहिले. अर्थात माझे मत १०० टक्के तुम्हाला पटलेच पाहिजे असे माझे म्हणणे नाही, असा खुलासा पवार यांनी केला.
‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात विधानसभेतील भाषणाची जी मी भूमिका मांडली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझे इतिहासाचे वाचन आणि आकलन याच्या आधारे माझी भूमिका तयार झाली, ती मी विधानसभेत मांडली होती. मी काही इतिहासतज्ज्ञ नाही, मी काही फार लिखाण केले असे नाही किंवा मी इतिहासाचा संशोधकही नाही. नव्या पुराव्यांच्या आधारे इतिहासाची सतत मांडणी होत असते,’ असे ते म्हणाले.
काकांना जाणता राजा म्हणा असे मी कुठे सांगतो शरद पवारांना ‘जाणता राजा’ म्हणण्यावर भाजपकडून आक्षेप घेतला जातो, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर चिडून अजित पवार म्हणाले, ‘माझ्या काकांना जाणता राजा म्हणा, असे मी कधी म्हणालो का? जे हा शब्दप्रयोग करतात त्यांनाच तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे,’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.