आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्ग-तृतीय वर्षाचा शुभारंभ नागपूर रेशीमबागस्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सोमवारी सकाळी झाला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले. याप्रसंगी रा. स्व. संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी मंगेश भेंडे यांनी देशभरातील सर्व प्रांतांमधून आलेल्या शिक्षार्थींना संबोधित केले.
संघाच्या प्रणालीत तृतीय शिक्षा वर्गाचे महत्त्व अधिक आहे. येथे येणाऱ्या शिक्षार्थींची भाषा वेगवेगळी असली तरी हृदय एक आहे. त्यामुळे संवाद साधण्यात कुठलीही अडचण येत नाही. हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे, असे भेंडे यांनी या वेळी बोलताना सांगितले. संघ शिक्षा वर्ग हा गंगोत्रीप्रमाणे आहे. गंगेतून कुणी कितीही पाणी घेतले तरी ते संपत नाही. त्याचप्रमाणे शिक्षा वर्गातून जितके ज्ञान घ्याल तितके कमीच आहे. शिक्षार्थ्यांची स्वतःचे विचार, कार्य यावर श्रद्धा असायला हवी. श्रद्धा आणि समर्पणासह साधना करत प्रत्येक शिक्षार्थीने संघाच्या कल्पनेतील कार्यकर्ता होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन भेंडे यांनी केले.
पथसंचलन २१ मे रोजी, २ जूनला समारोप
याप्रसंगी सहसरकार्यवाह राम दत्त, सहसरकार्यवाह मुकुंद उपस्थित होते. १९२७ मध्ये पहिल्या संघ शिक्षा वर्गाचे आयोजन मोहिते वाडा, नागपूर येथे करण्यात आले होते. चाळीस दिवसांच्या त्या वर्गात एकूण १७ शिक्षार्थींचा समावेश होता. यंदाच्या वर्गात एकूण ७३५ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. वर्गाचे पथसंचलन २१ मे २०२२ रोजी सायंकाळी होईल, तर वर्गाचा समारोप २ जून २०२२ रोजी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.