आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा110 कोटींचा नागपूर भूखंड घोठाळा निश्चित झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा. यावर अजून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का? शिंदे-फडणवीसांमध्ये मांजर बोक्यांची वाटणी झालीये का?, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तसेच नागपूर येथील भूखंड घोटाळ्यावरून संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
एकनाथ शिंदेंना उत्तर द्यावे लागेल
संजय राऊत म्हणाले, नागपूर येथे भूखंड वाटपाचा घोटाळा निश्चित झाला आहे. स्वत: उच्च न्यायालयाने यावरून शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एकनाथ शिंदे यांनी 83 कोटींहून अधिक किंमतीचे भूखंड केवळ 2 कोटीत बिल्डरांना विकले. याचे उत्तर एकनाथ शिंदेंना द्यावेच लागेल.
एवढी बेअब्रू कधी झाली नाही
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज कानफडात मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाल चोळत विधानसभेत जात आहेत. यापूर्वी महाराष्ट्राची एवढी बेअब्रू कधीही झालेली नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका बोटचेपी आहे.
आता जोश दाखवा
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात की सीमाप्रश्नासाठी आम्ही काठ्या खाल्ल्या आहेत. आता तो जोर कुठे गेला? आता जोश दाखवा ना. आता सीमाप्रश्नावर ठोस भूमिका घेणार नसाल तर मुख्यमंत्री पदावर बसण्यास तुम्ही योग्य नाही, अशी टीका एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांनी केली.
दिल्लीत गुंगीचे औषध टोचले
संजय राऊत म्हणाले, सत्तेत येताच सीमावाद पेटला हीच एकनाथ शिंदे यांची क्रांती आहे. त्यांच्या तोडांत कुणी बोळा कोंबला आहे का? दिल्लीत सीमावादावरील बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना गुंगीचे औषध टोचून पाठवले आहे. मात्र, या प्रश्नावर लोकांच्या भावना तीव्र आहेत. हे सरकारला कळत नसेल तर कठीण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.