आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Sanjay Raut Said 3.5 Bjp Leader In Jail | Marathi News | Now The Toss Is Over, Let The Match Happen! Aditya Thackeray's Suggestive Reply To Sanjay Raut's Statement

राजकारण पेटले:आता टॉस झाला आहे, सामना तर होऊ द्या! संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचे सूचक उत्तर

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांसह आरोप करणारे भाजपचे साडेतीन नेते जेलमध्ये राहतील असे म्हटले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता “आधी टॉस झाला आहे, सामना तर होऊ द्या,’ असे सूचक उत्तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. राऊत हे मंगळवारी (१५ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मुंबईत काँग्रेसच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती, परंतु मुंबई पोलिसांनी कुशलतेने परिस्थिती हाताळली, असे कौतुकोद्गार ठाकरे यांनी काढले. नागपूरसह विदर्भात शिवसेनेत नाराजी आहे या बातम्या मला मीडियाकडूनच समजतात. वस्तुत: असे काही नाही, असे सांगत ठाकरेंनी नाराजीचे आरोप फेटाळले. अजनी वनसाठी स्थानिक नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. अजनी वन वाचवण्यासाठी ते आग्रही आहेत.

अजनी रेल्वेस्थानक परिसरात इंटर मॉडेल स्टेशन कोणाला नको असे नाही. पर्यावरण वाचवून शाश्वत विकास होत असेल तर मी त्या बाजूने आहे. यासंदर्भात मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न करू. वादाची भूमिका न घेता सामंजस्याने मार्ग काढू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. सायंकाळी त्यांनी अजनी वनला भेट दिली.

राऊतांना बळ देण्यासाठी नाशकात शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

महाविकास आघाडीमधील मंत्री तथा नेत्यांवर ईडी, सीबीआय तसेच अन्य केंद्रीय तपास संस्थांकडून सुरू झालेल्या कारवाई सत्रामागे भारतीय जनता पक्ष असून त्यांची पोलखोल करण्यासाठी मुंबईतील शिवसेना भवनात मंगळवारी दुपारी चार वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला पाठिंबा देण्यासाठी नाशकातून खासदार, आमदार, नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य व संघटनेतील महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले आहे. खास करून ईडीसारख्या तपास संस्थेकडून राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली असून राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेतेपद असल्यामुळे त्यांना बळ देण्यासाठी नाशकातून जास्तीत जास्त शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे.

शिवसेना स्टाइल उत्तर देणार
मंत्र्यांना तसेच नेत्यांना टार्गेट केले जात आहे. या सर्वांना उत्तर देण्यासाठी शिवसैनिक सक्षम असून नाशिकमधून खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व प्रमुख पदाधिकारी जाणार असल्याचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले.

राजकारणासाठी नाशिक ‘हॉट’
राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष तीव्र झाला असून मध्यंतरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम नाशकात झाले. त्यामुळे नाशिक आता हॉट ठरत आहे.

अॅश अँड डंपिंग बंद करू
नागपूर जिल्ह्यातील नांदगाव आणि वारेगाव येथील अॅश अँड डंपिंग कायमस्वरूपी बंद करण्यात येऊन त्या जागा वेगाने पूर्ववत केल्या जातील, असे आश्वासन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्थानिकांना दिले. ग्रामस्थांकडून आलेल्या, विशेषत: महिलांकडून आलेल्या तक्रारीनंतर परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा त्यांनी घेतला.

बातम्या आणखी आहेत...