आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो, जाणून महाविकास आघाडीच्या बैठकीत सावरकर हा विषय थांबवण्याचा सल्ला देणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाहवर मात्र स्वत:च सविस्तर बोलले. विशेष म्हणजे शुक्रवारी आयोजित पत्रपरिषेत काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य रंजीता रंजन यांनी सावरकर विषयावर बोलण्यास नकार दिला होता.
स्वातंत्र्यवीर सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही. याचा अर्थ त्यांच्या महत्व नाही असे नाही. देशासाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पणाला तोड नाही. आपल्याला प्रगतीशील विचारांचे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार करणारे सावरकरही स्वीकारावे लागतील. "गाय हा एक उपयुक्त पशु आहे' असे सावरकर म्हणाले होते. तर काळाराम मंदिरात पूजेसाठी इतर समाजाचा पुजारी नेमला होता, हेही सावरकर स्वीकारले पाहिजे असे पवार म्हणाले.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र या निवडणूका एकत्रित होणार नाहीत असा माझा अभ्यास सांगतो असे पवार यांनी सांगितले. जानेवारी 2024 मध्ये राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. आणि त्या नंतरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. हे लक्षात घेता या निवडणुका सत्ताधाऱ्यांकडून धार्मिक मुद्यावर लढवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र महाविकास आघाडी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीचे मुद्दे घेऊन निवडणूकांना सामोरे जाईल असे पवारांनी स्पष्ट केले.
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून काँग्रेसने देशभर वातावरण तापवले आहे. अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक कोणी केली याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. या मागणीला राष्ट्रवादीचाही पाठींबा आहे. मात्र या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एक समिती स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आणावे अशी मागणीही पवार यांनी केली.
गौतम अदानी यांच्याबद्दल शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अतिशय सकारात्मक आणि कौतुक करणारे लेखन केले आहे. त्याकडे लक्ष वेधले असता आपण शंतनुराव किर्लोस्कर यांच्यापासून तर राहुल बजाज यांच्यापर्यत अनेक उद्योगपतींबद्दल वेळोवेळी लिहिलेले आहे. त्याबद्दल माझ्या भूमिकेत बदल करण्याची गरजच नाही असे पवार यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.