आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही:वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे सावरकर स्वीकारावेत, अदानींची चौकशी व्हावी : शरद पवार

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही. याचा अर्थ त्यांना महत्त्व नाही असे नाही. देशासाठी त्यांनी केलेला त्याग व समर्पणाला तोड नाही. आपल्याला प्रगतिशील विचारांचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणारे सावरकरही स्वीकारावे लागतील. “गाय हा एक उपयुक्त पशू आहे’ असे सावरकर म्हणाले होते, तर पतित पावन मंदिरात पूजेसाठी त्यांनी वाल्मिकी समाजाचा पुजारी नेमला होता, हेही सावरकर स्वीकारले पाहिजे,’ असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र या निवडणुका एकत्रित होणार नाहीत, असा माझा अभ्यास सांगतो. जानेवारी २०२४ मध्ये राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. त्यानंतरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील. हे लक्षात घेता या निवडणुका सत्ताधाऱ्यांकडून धार्मिक मुद्द्यावर लढवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र महाविकास आघाडी राष्ट्रीय व स्थानिक पातळीचे मुद्दे घेऊन निवडणुकांना सामोरे जाईल, असे पवारांनी स्पष्ट केले.सावरकरांचा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो हे जाणून आघाडीच्या बैठकीत सावरकर हा विषय थांबवण्याचा सल्ला पवारांनी दिला.

अदानींची चौकशी व्हावी
उद्योगपती गौतम अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक कोणी केली याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. या मागणीला राष्ट्रवादीचाही पाठिंबा आहे. मात्र याव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एक समिती स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आणावे, अशी मागणीही शरद पवार यांनी केली.