आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चला, गावोगावी सावली वाटूया!:नामशेष झालेल्या देशी आंब्यांच्या कोयी गोळा करून त्या लावण्याचा उपक्रम..

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेते सयाजी शिंदे व लेखक अरविंद जगताप यांच्या सह्याद्री देवराईचा पुढाकार

अभिनेते सयाजी शिंदे आणि कथा लेखक अरविंद जगताप यांच्या सह्याद्री देवराईने आता लुप्तप्राय झालेल्या देशी आंब्यांच्या विविध प्रजाती गोळा करून त्या लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. १५ जूनपर्यत कोयी संकलित करण्यात येणार असून त्याची रोपे तयार करून लावण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर येथील वृक्षमित्र विजय निंबाळकर यांनी दिली. लोक हापूस व पायरीच्या कोयी आणीत आहेत. पण, आम्हाला देेशी प्रजाती हव्या आहेत, असे ते म्हणाले.

पूर्वी गावागावातील आमराईत स्थानिक प्रजाती होत्या. कालाैघात आंब्याच्या झाडाच्याही पिढ्या नष्ट झाल्या. परंतु आजही काही ठिकाणी मोजके लोक या प्रजाती राखून आहेत. त्यांच्याजवळून या कोयींचे संकलन केले जात आहे. दुर्दैवाने नव्या पिढीला आंब्याच्या अस्सल देशी जाती माहितीही नाहीत. शेप्या, लालपरी, गोटी आंबा, रायवळ, खारीक आंबा, कागद्या, लोणच्या, केसर, शेंदऱ्या, नारळ्या, बिटका, केळ्या, गाडग्या अशी कितीतरी नावं होती. यातल्या ठरावीक झाडाच्या कैऱ्यांचाच खार व्हायचा.

कमी तेल वापरून मुरलेला खार अजूनही जिभेवर आहे. त्याला सुटलेलं पाणी भाकरीला घोळसून खाण्यात काय मजा होती. या सगळ्या आठवणी पुन्हा रुजण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या महिन्यात जेवढ्या वेगवेगळ्या देशी आंब्याच्या कोयी गोळा करता येतील तेवढ्या करण्याचे आवाहन सह्याद्री देवराईने केले आहे. संबंधित भागातले वृक्षमित्र त्या गोळा करणार आहे.

आंब्याचे नुसते नाव नव्हे तर कोयीचा इतिहास

कोयीची माहितीही द्यायची आहे. कोय कोणत्या प्रकारची? त्या आंब्याला तुमच्या भागात काय म्हणतात? आंबा कुणी लावला होता? ही झाडं लावणाऱ्या माणसांची नावं जगाला कळायला पाहिजेत. ३० मे पर्यंत कोया गोळा करून ८ जूनपर्यंत त्या वाळवून १२ जूनपर्यंत सुहास वाईंगनकर : ९४२१२९०११२, विजय निंबाळकर : ८२७५३६९३८३, धनंजय शेडबाळे : ९८२२३९४६७० आणि रघुनाथ ढोले : ९८२२२४५६४५ या वृक्षमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...