आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्टंट लोन' फसवणूक प्रकरण:चीनचा हॅकर पाठवायचा रोज किती जणांना फसवायचे याची यादी

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टंट लोन अ‍ॅपचे कनेक्शन थेट चीन सोबत असल्याचा खुलासा नागपूरचे पोलिस उपायुक्त नुरुल हसन यांनी केला होता. या प्रकरणात चीनचा हॅकर दोघा आरोपींना किती जणांची फसवणूक करायची याची यादी पाठवायचा ही बाब तपासात समोर आली आहे.

कैफ इब्राहिम सय्यद (वय 25 रा. सोमवार पेठ, कऱ्हाड), ईरशाद ईस्माईल शेख (वय 32 रा. दापोडी, पुणे) यांनी वसूल मेच्या 3 टक्के कमिशनवर काम करीत असल्याचे सांगितले. अधिक तपास केला असता, त्यांच्याकडे येत असलेले ‘व्हॉट्सॲप’ क्रमांक हे हाँकाँग, चीन, दुबई, फिलिपिन्स येथील असल्याची बाब समोर आली. त्यामुळे या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता असल्याची माहिती अजनीचे ठाणेदार दुर्गे यांनी दिली.

कोणाकडून किती पैसे उकळायचे याची यादी चीनी हॅकर दोघांच्या व्हाॅटस अ‍ॅपवर पाठवीत असे. यात सुमारे 25 जणांची नावे असायची अशी माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान हे पैसे चीनच्या सायबर गुन्हेगाराला पाठविण्यासाठी हे दाेघे बायनान्स या अ‍ॅपचा उपयोग करीत होते. या अ‍ॅपद्वारे भारतीय चलन क्रिप्टो करन्सीत बदलते. या दोघांच्या खात्यात 50 लाखांचा व्यवहार झाल्याचीही माहिती आहे.

नागपुरातील 20 वर्षीय तरूणीने ऑनलाईन कर्ज मिळविण्यासाठी मोबाईल अ‍ॅपवर अर्ज भरला होता. मात्र, काही दिवसांतच तिचे नग्न छायाचित्र इंटरनेटवर टाकण्याची धमकी तरुणीला देऊन, तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. ते पैसे थेट चीनमधील एका बँक अकाऊंटमध्ये गेल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, नागपूर पोलिसांनी चीनपर्यंत पैसे पोहचविणाऱ्या पुण्यातील दोघांना अटक केली. लवकरच यामध्ये मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त नरूल हुसन यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...