आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:11 लाख रुपये शाळा शुल्काची अफरातफर, पसार संशयितांचा शोध सुरू

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पालक आणि विद्यार्थ्यांनी दिलेली ११ लाख १३ हजार १७० रूपये फी शाळेत जमा न करता परस्पर अफरातफर करणाऱ्या शाळेच्या क्लर्क विरोधात वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फरार क्लर्कचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमरेड रोड येथे एस. पी. पब्लिक स्कूल आहे. या शाळेमध्ये स्नेहा प्रवीण अंबर्ते उर्फ स्नेहा मारोतीराव खराते (वय ३४, वृंदावन नगर) ही कॅशीयर व क्लर्क म्हणून काम करते.

पालक तसेच विद्यार्थ्यांनी जमा केलेली ११ लाख १३ हजार १७० रूपये रक्कम शाळेच्या बँक खात्यात जमा न करता तसेच अध्यक्ष वा सचिवाकडे जमा न करता अफरातफर केली. या प्रकरणी शाळेचे अध्यक्ष संजय श्रीरामजी पेंढारकर (वय ५४, आराधना नगर) यांनी दिलेल्या तक्रारी वरून भादंवि कलम ४०६ व ४१९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तक्रार दाखल होताच आरोपी क्लर्क फरार झाली.

वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला अटक

दुसऱ्या एका प्रकरणात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दाेन महिला आरोपींना अटक केली. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत हुडको काॅलनी येथे फरीदा मोहंमद खान (वय ४३) या महिलेच्या फ्लॅटवर धाड मारून एका अल्पवयीन मुलीसह तिला अटक केली. मुलगी धनश्री उर्फ सोनी हीरामन वाघमारे (वय ३५) हीच्या माध्यमातून पुरवण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने तिलाही अटक करण्यात आली.