आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळा सुरू:कोरोनाच्या सावटात नागपुरातील शाळा सुरू, शाळेत येताना पालकांचे संमतीपत्र अनिवार्य

नागपूर4 महिन्यांपूर्वीलेखक: अतुल पेठकर
  • कॉपी लिंक
  • पहिल्या दिवशी नववी व दहावीचे विद्यार्थी तुरळक संख्येत आले

कोरोनाच्या सावटात धास्तावलेल्या वातावरणात आणि काहीशा साशंक मनाने राज्याची उपराजधानी नागपुरातील महापालिका क्षेत्रातील शाळा सोमवार, (दि.4) रोजी सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना शाळेत येताना पालकांचे संमतीपत्र आणने अनिवार्य होते. पहिल्या दिवशी मोजकेच विद्यार्थी आले होते. त्यांना सामाजिक दुरीतेचे पालन करीत वर्गात बसवण्यात आले.

कोरोनामुळे तब्बल 10 महिने शाळा बंद ठेवाव्या लागल्या. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर दहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला परवानगी मिळाली आहे. त्यानुसार सोमवारी शाळांची पहिली घंटा वाजली. शाळा प्रशासनाने शाळेमध्ये सुरक्षेच्या सर्व सुविधांची पूर्ती केलेली दिसून आली. शाळेमध्ये थर्मोमीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, सॅनिटायजर, पाणी आदी सर्व आवश्यक व्यवस्था शाळांनी स्वत:च केली होती. पहिल्या दिवशी नववी व दहावीचे विद्यार्थी तुरळक संख्येत आले होते.

खामला येथील सोमलवार हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय. एस. गोन्नाडे यांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. महापालिकेकडे रितसर पत्र पाठवून शाळेचे निर्जंतुकीकरण करून देण्यासोबतच थर्मोमीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, सॅनिटायजरचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु महापालिका प्रशासनाने काहीही मदत केली नाही, असे गोन्नाडे यांनी सांगितले. शिक्षकांची एनटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांची चाचणी करण्याचे कोणतेही निर्देश नसल्याने ते विनाचाचणीचे शाळेत आले. त्यांची जबाबदारी घेण्यास कोणीच तयार नसल्याने पालकांवर टाकण्यात आल्याचे गोन्नाडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...