आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण स्नेही गणेश मूर्तिकला स्पर्धा:मूर्तिकारांसाठीही मूर्तीकला निर्मिती कंपन्या स्थापन व्हाव्या, नितीन गडकरींची व्यक्त केली अपेक्षा

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वस्तू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कलाकारांना नि:शुल्क मिळाला, तरच वस्तूची किंमत कमी होईल. शेतकरी उत्पादक कंपन्यांप्रमाणे मूर्तिकारांसाठीही मूर्तीकला निर्मिती कंपन्या स्थापन व्हाव्या असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

विदर्भस्तरीय पर्यावरण स्नेही गणेश मूर्तिकला स्पर्धेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते रविवारी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष अवधेश ठाकूर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करीर, दमक्षेचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर आदी उपस्थित होते.

आपली वस्तू-उत्पादन समाजात लोकप्रिय करायचे असेल तर त्या वस्तूचा दर्जा, गुणवत्ता आणि डिझाईन उत्तम असले पाहिजे. तेव्हाच त्या वस्तूला ग्राहक किंमत देईल. यासाठी कलाकारांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मूर्तिकारांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ व दमक्षे या संस्थांना प्रयत्न करावा. कलाकारांना लागणारी माती त्यांच्या घरापर्यंत नि:शुल्क कशी पोहोचविता येईल यासाठी एक योजना तयार केली जावी. तसेच या मूर्तिकारांच्या मूर्तींचे प्रदर्शन भरवून त्यासाठी त्यांना जागा उपलब्ध व्हावी. त्यांच्या मूर्ती विकल्या गेल्या तर कलाकारांना पैसा मिळेल व कलेला वावही मिळेल, असेही ते म्हणाले.

पीओपी मूर्तिकारांनीही मातीच्या मूर्ती तयार करण्याचा संकल्प करावा असे आवाहन गडकरींनी केले. गणेश मूर्ती बनविणार्‍या कलाकारांना प्रोत्साहन देण्याची गरज असून या कलेचा विकास करण्यासाठी कलाकारांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...