आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. यंदा प्रथमच विधान भवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेक प्रकरण राज्यभरात गाजले. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून विधानभवन परिसरात शाईच्या पेनवर बंदी घालण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून शाई पेनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे, महाराष्ट्र द्रोहाला संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षाचे, महाआघाडीचे सर्व आमदार आंदोलनात सहभागी झाले.
आत्राम यांना झेड प्लस सुरक्षा द्या : आव्हाड
पहिला दिवस तसा शांत गेला. विधानसभेतही फारसे काही झाले नाही. आमदार आत्राम यांना यांना नक्षलवाद्यांनी धमकी देण्यात आली आहे. आत्राम यांना मुख्यमंत्र्यांसारखी झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यावर गृह राज्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना नक्षल्यांची धमकी मिळाली, त्यावेळीही झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी पुढे आली होती. गृहराज्यमंत्री म्हणून मी संपूर्ण माहिती घेऊन सुरक्षा देण्याचा अहवाल दिला होता. पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी फाइलवर सहीच केली नाही, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.