आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सेल्फ बॅलन्सिंग स्कूटर करणार नागपूर पोलिसांना अधिक गतिमान अन् दृश्यमान

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक चार्जमध्ये धावते 25 किमी, प्रायोगिक तत्त्वावर सुरू

नागपूर पोलिसांना अधिक गतिमान आणि दृश्यमान करण्यासाठी दहा सेल्फ बॅलन्सिंग स्कूटरला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवली. या वेळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित हाेते. नागपुरातील फुटाळा तलाव, शुक्रवार तलाव, वाॅकर रोड तसेच सिव्हिल लाइन येथे याचा उपयोग करण्यात येणार आहे. नागपुरात प्रायोगिक स्तरावर या स्कूटरचा उपयोग होणार आहे. यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात उपयोग करण्यात येईल. विविध कंपन्यांच्या सीएसआर निधीतून या स्कूटर घेण्यात आल्या असून त्याची किंमत प्रत्येकी १ लाख १० हजार २५० रुपये इतकी आहे. याद्वारे दृश्यमान पोलिस निगराणी करणे शक्य होणार असून यासाठी १५ महिला व १५ पुरुष शिपायांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या दुचाकीला ब्रेक तसेच अॅक्सिलरेटर नाही. पायाचा घोटा तसेच टाचेच्या दबावावर वेग कमी जास्त करता येतो. विविध सणावारांच्या बंदोबस्ताच्या वेळी या स्कूटरचा उपयोग हाेतो.

अशी आहे सेल्फ बॅलन्सिंग स्कूटर
या सेल्फ बॅलन्सिंग स्कूटरचे वजन ६० किलो ग्रॅम असून १२० किलोग्रॅम वजन सहन करण्याची क्षमता आहे. ही स्कूटर ३६० अंश मर्यादेपर्यंत वळवता येते. वेगमर्यादा ताशी १८ किमी असून एकदा चार्ज केल्यानंतर २५ किमीपर्यंत चालते. चार्जिंगसाठी अॅडॉप्टर दिलेला असून ८ ते १० तास लागतात. स्कूटरचे हंॅडल उंचीनुसार कमी जास्त करता येते. दोन्ही चाकांवर दोन बाॅक्स दिलेले असून त्यात वाॅकीटाॅकीसह इतर साहित्य ठेवता येते. स्कूटरला पीबी, ४८ मेगावॅटची बॅटरी देण्यात आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser