आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाईक यांचे वृद्धापकाळाने निधन:ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी मंत्री हरिभाऊ नाईक यांचे निधन; वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मध्यरात्री 1 वाजता आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 94 वर्षांचे होते. कामगारांबद्दल आस्था असणारा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देणारा नेता गमावल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी कामगार राज्यमंत्री राहिलेल्या हरिभाऊ नाईक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, ILO जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे अध्यक्ष तसेच विविध सामाजिक, राजकीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले. नाईक यांच्यावर आज सायंकाळी 4 वाजता मोक्षधाम, घाटरोड नागपूर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

हरिभाऊ नाईक हे आपल्या नैतिक मूल्यांसाठी ओळखले जात होते. 1971 मध्ये त्यांनी महापौर असताना काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या अपक्षाच्या गटातील उमेदवाराचा उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याने नैतिकता जपण्यासाठी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. ज्या पक्षाचे व त्याला पाठिंबा देणाऱ्या गटाचे मी नेतृत्त्व करत आहे, त्याच गटातील उमेदवाराबाबत दगाफटका होत असेल तर सत्तेत राहण्याचा अधिकार उरत नाही म्हणून मी पाऊलं उचलली, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. लोकांमध्ये एक लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...