आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:मराठा समाजाच्या 12% जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा : वडेट्टीवार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीमंत मराठे पदाेन्नती आरक्षणाचे विरोधक : आंबेडकर

मराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. आेबीसींसह इतर मुलांचे वय वाढत चालले आहे. अशा वेळी ओबीसी मुलांनी बेरोजगार म्हणून फिरायचे काय, असा सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केला. ओबीसींसह इतर समाजातील मुलांना कदापि वेठीस धरायला नको. मराठा समाजावर अन्याय व्हायलाच नको, पण असे करताना ओबीसींवरही अन्याय नको, असे ते म्हणाले.

नोकरभरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढत आहे. कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशा भावनाही वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या. यासंदर्भात अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेऊन लवकरच निर्णय घेऊ. मोठ्या समाजाने लहान समाजाला किती दाबत ठेवायचे, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

राज्य सरकारने मराठा समाजाला नोकऱ्यांत १२ % आरक्षण दिले. याला कुणी कोर्टात आव्हान देत असेल तर न्यायालयीन प्रक्रियेला किती वेळ लागेल, हे कुणाच्या हातात नाही. तोपर्यंत मराठा समाजाच्या जागा न भरता इतर समाजाच्या जागा भरणे योग्य राहील, असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

श्रीमंत मराठे पदाेन्नती आरक्षणाचे विरोधक : आंबेडकर
मुंबई | राज्यात मराठा समाजातील श्रीमंत लोक आरक्षणाच्या विरोधात असून त्यांना मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळू द्यायचीच नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने याप्रश्नी १२ मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. मात्र ती नावालाच आहे.