आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धा:सेवाग्रामच्या डॉक्टर खांडेकरांनी मास्क घालून केली पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी, म्हणाले - पीपीई किटने आत्मविश्वास कमी होतो, रुग्णांकडे होते दुर्लक्ष

वर्धाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना आजाराचा संसर्ग वाढताच खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले. त्याचा मोठ्या प्रमाणात बाऊ सुद्धा करण्यात आला. अशाच परिस्थितीत सेवाग्राम रुग्णालयाचे प्राध्यापक डॉ खांडेकर यांनी कोरोना बाधित रुग्णांवर पीपीईकिट परिधान न करताच मुखवटा घालून कोविड कक्षात उपचार केले आहेत. किट घातल्याने आत्मविश्वास कमी होत असून, रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.

देशात कोरोना आजाराचे सावट पसरले आहेत, अनेकांना या आजाराचा संसर्ग झाला असून, सर्व कोविड रुग्णालयातील खाटा फुल्ल झाल्या आहेत. राज्यकर्त्यांनी कोरोना आजाराची साखळीत खंड पडावी यासाठी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर व अँटीजन चाचणी घेण्यात येत आहे. त्या चाचणीमधून अनेक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. कोविड कक्षात कोरोना बाधित रुग्णांवर पीपीई किट परिधान करुन उपचार केले जात आहेत. सेवाग्राम येथील कोविड कक्षात सतत 15 दिवस पीपीई किट परिधान न करता 90 कोरोना बाधित रुग्णांवर एन 95 मुखवटा घालून उपचार डॉक्टर खांडेकर यांच्या कडून करण्यात आले आहे.

कोरोना आजाराचा मोठ्या प्रमाणात बाऊ करण्यात येत आहेत. कोरोना हा एक विषाणू असून, त्याला 24 तास डोक्यामधून बाहेर काढावे, कोरोना विषाणू हा सदैव सोबतीला राहणार आहे. या भीतीतून बाहेर निघाल्यास आपण पूर्वीसारखे आयुष्य जगू असा विश्वास सेवाग्राम रुग्णालयाचे प्राध्यापक डॉ इंद्रजीत खांडेकर यांनी व्यक्त केला आहे. डॉ खांडेकर यांनी यापूर्वी सुद्धा कोरोना बाधित रुग्णांजवळ घरातील सदस्य असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. घरातील सदस्य रुग्णांजवळ असल्यास त्यांचे मनोबल वाढण्यासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता तर चक्क त्यांनी इतर डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी कुठल्याही प्रकारची पीपीई किट परिधान न करताच फक्त मुखवटा घालून रुग्णांवर उपचार सुरु केले असल्यामुळे हा एक नवीन अविष्कार असल्याचे दिसून येत आहे.

पीपीईकिट घातल्याने आत्मविश्वास कमी होतो कोविड कक्षात सर्व सहकारी पीपीई किट परिधान करुन रुग्णांवर उपचार करतात. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. रुग्णांकडे दुर्लक्ष होते. पीपीई किट परिधान केल्यास डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण होत आहे. वैद्यकीय चुकांमुळे रुग्ण गंभीर होण्याचे व मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढत आहेत.

बातम्या आणखी आहेत...