आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:काेरोना संकटाच्या काळात फक्त गरजूंनाच रेशन मिळावे म्हणून अवघ्या दोन दिवसांत तयार केले 'सेवा जंक्शन' अॅप

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणाला कोणी किती मदत केली याची तारीखवार संपूर्ण माहिती मिळणार, असे काम करते अॅप

(अतुल पेठकर)काेरोनामुळे अडकलेले शेकडो मजूर पायपीट करीत गावाकडे निघालेले आहेत. अनेकांवर अन्नपाण्यासाठी रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. अशा वेळी विविध सामाजिक तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांतर्फे मदतीचा ओघ सुरू आहे. यात अनेकदा गरज नसताना अतिरिक्त मदत दिल्याचे प्रकार होतात. त्यामुळे खरे गरजू वंचित राहण्याच्या घटना घडतात. पण, आता फक्त खरोखर गरजू असलेल्यालाच मदत मिळेल, असे “सेवा जंक्शन’ हे अॅप आहे. देशभरात सुरू असलेल्या सेवाकार्यात या अॅपचा उपयोग होऊ शकतो. विविध स्वयंसेवी संस्थांसाठी हे अॅप िवकसित केल्याचे आयअॅमफर्स्ट डिजिशियन सोल्युशनचे संचालक प्रवीण परिहार यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले. अन्य एक संचालक शशांक गडकरी यांच्या सहकार्याने प्रणय परिहार व स्वप्निल ढंगारे यांनी दोन दिवसांत अॅप तयार केले.

लॉकडाऊनने अनेकांवर वाईट परिस्थिती ओढवली आहे. कोणीही उपाशी झोपू नये म्हणून संस्था, संघटना कार्यरत आहेत. वैयक्तिक स्तरावरही मदत सुरू आहे. पण, गरजूलाच मदत मिळावी आणि कोणालाही अतिरिक्त मदत मिळू नये अशा पद्धतीने हे अॅप काम करते. ते गुगल प्ले स्टोअरमधून विनामूल्य डाऊनलोड करता येते. देणगीदाराकडून रेशनचे पद्धतशीर संकलन करणे आणि गरजू लोकांमध्ये त्याचे अचूक वितरण करण्यासाठी हे अॅप काम करते. कुणालाही अतिरिक्त रेशन मिळू नये आणि प्रत्येक गरजूंना देणगी देणाऱ्या यंत्रणेने त्याला दिलेला रेशनचा कोटा मिळावा याची खात्री करण्यासाठी हे अ‍ॅप मदत करते, असे परिहार यांनी सांगितले.

असे काम करते अॅप

मदत वाटप करणारी स्वयंसेवी संस्था अॅपमध्ये गरजूंची नोंदणी करील. त्यानंतर संबंधिताचा आधार कार्ड, रेशन कार्ड नंबर व वीज ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर गरजूला आतापर्यंत किंवा यापूर्वी कोणी आणि किती मदत केली आहे याची संपूर्ण माहिती कळते. यामुळे कोणाजवळ किती िदवसाचे रेशन आहे हेही माहिती होते. अॅपमध्ये वितरित मदतीच्या तारखेनुसार नोंद होते. लोकांमध्ये वितरित होणारे अनावश्यक किंवा अतिरिक्त रेशन किट तपासले जाईल.

बातम्या आणखी आहेत...