आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री शंभूराज देसाईंनी बसवराज बोम्मईंना सुनावले:अर्धा इंच जागाही कर्नाटकला देणार नाही, सहनशीलतेला काही मर्यादा असतात

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या हक्काची एक इंच काय तर अर्धा इंच जागाही कर्नाटकला देणार नाही, अशा शब्दांत मंत्री शंभूराज देसाई यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सुनावले.

महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, असे वक्तव्य बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधिमंडळात केले आहे. त्याचे पडसाद आज महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनातही उमटले.

बसवराज बोम्मईंनी संयम ठेवावा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नेमलेले समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेत बसवराज बोम्मईंना सडेतोड प्रत्युत्तर दिले. शंभूराज देसाई म्हणाले, सीमावादासंबंधी बसवराज बोम्मई यांनी संयम ठेवायला हवा. महाराष्ट्राच्याही सहनशीलतेच्या काही मर्यादा असतात. सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करून समन्वयाची भूमिका घेतली आहे.

अन्यथा कोयनातून पाणी सोडणार नाही

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, अमित शहांनी केलेल्या सूचनेप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही सामंजस्याने हा वाद सोडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र, बसवराज बोम्मई दमदाटी, अरेरावीची भाषा करत आहेत. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. कर्नाटकचाही बहुतांश भाग कोयना धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. उन्हाळ्यात कर्नाटकच्या अनेक भागांना जेव्हा पाण्याची गरज असते, तेव्हा माणुसकीच्या नात्याने आम्ही महाराष्ट्रातील पाणी कमी करून कोयना धरणातून पाणी सोडतो. मात्र, तुम्ही अशीच अरेरावी करत असाल तर आम्हाला कोयनाचे पाणी सोडण्याबाबत गंभीर विचार करावा लागेल, असा इशारा शंभूराज देसाईंनी दिला.

अधिक तीव्र भाषेत उत्तर देऊ

शंभूराज देसाई म्हणाले, सीमाभागातील 365 गावांतील मराठी भाषिकांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उद्दाम वागण्यामुळे मराठी माणसाचे रक्त सळसळले आहे. आता बसवराज बोम्मई यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केल्यास शंभर पटी अधिक तीव्र भाषेत उत्तर देऊ.

काय म्हणाले होते बसवराज बोम्मई?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समज दिल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा एकदा बरळले आहेत. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, असे वक्तव्य बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधिंडळात केले आहे. तसेच, याबाबतचा ठरावही विधिमंडळात मांडण्यात येईल, असे बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर

महाविकास आघाडीही आक्रमक

बेळगाव, कारवार, निपाणी तसेच सीमाभागातील एक एक इंच जागा महाराष्ट्रात आली पाहीजे. यासाठी या हिवाळी अधिवेशनात ठराव मांडून तो नक्की मंजूर केला जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...