आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात नुकत्याच झालेल्या सत्ता संघर्षानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार 7 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे एकाच व्यासपीठा येणार आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने राज्यातील हे तिन्ही नेते एकत्र येणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली. दिल्लीतील या कार्यक्रमाला वीस हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहितीही तायवाडे यांनी दिली.
याशिवाय या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आदी नेत्यांसह सर्वपक्षीय नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या स्थापनेपासून ओबीसींचं अधिवेशन प्रत्येक राज्यात घेण्यात आले. जातीनिहाय जनगणना, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय आणि देशभरात ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळावे आदी मागण्या या अधिवेशनात करण्यात येणार आहेत. तसेच राज्य सरकार आणि केंद्राकडेही काही मागण्या करण्यात येणार असल्याचे तायवाडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.