आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी भाजप नेते तथा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. उभयातांमध्ये बऱ्याच वेळा चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यावेळी शरद पवार यांच्यासोबत अनिल देशमुख देखील उपस्थित होते.
नितीन गडकरी यांच्या निवास्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज्यातील राजकारणात दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. राज्यात एकमेकांच्या विरोधात असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीने चर्चांना मात्र उधाण आले आहे.
विकास कामांवर चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. उद्या ते मध्य प्रदेशातील शिवनी येथे होणाऱ्या आदिवासी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी 100 एक्कर जागा घेण्यात आली आहे. आज शरद पवार यांनी नागपूर येथे वसंतदादा इंस्टिट्यूटच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर ते काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्या शेतावर गेले. त्यानंतर त्यांनी नितीन गडकरी यांच्या घरी भेट दिली. या भेटीत राज्यातील विविध विकास कामांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीसही नागपुरात
नितीन गडकरी आणि शरद पवार यांची ही काही पहिली भेट नाही. दिल्ली आणि काही दिवसापूर्वी पुण्यातही त्यांची भेट झाली होती. तेव्हा देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राज्यातील दंगली, धमकी, कुरघोडीचे राजकारण पाहता या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सध्या नागपुरात आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.