आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला, ठाकरे गटाला डावलले:नागपुरातील विधान भवनातील कार्यालयावर ताबा, ठाकरे गट बॅकफूटवर

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर हिवाळी अधिवेशनातही कार्यालयावरुन ठाकरे, शिंदे गटात रस्सीखेच पाहायला मिळाली. पण सत्तेत असलेल्या शिंदे गटालाच नागपूर विधानभवनातील कार्यालय मिळाले अन् ठाकरे गट ऐनवेळी उघड्यावर पडला. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यालयामागील कार्यालय ठाकरे गटाला देण्यात आले आहे.

आधी ठाकरे गटाचा ताबा

महाराष्ट्रात गत जून महिन्यात सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधीमंडळ अधिवेशनातही शिवेसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला मिळणार यावरून वाद झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाने या कार्यालयावर आपला ताबा मिळवला होता. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचे फोटोही लावण्यात आले होते.

कुणकुण लागताच सचिवांकडे धाव

नागपूर विधान भवन परिसरात असणारे शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला देण्यात येत आहे. तसे लेखी आदेश लवकरच जारी होणार असल्याची कुणकुण विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतेली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लागली होती. त्यानंतर त्यांनी लागलीच विधानभवनात धाव घेऊन विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना जाब विचारला होता.

दानवेंनी केला होता सवाल

विधीमंडळाच्या दस्तावेजांनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटच आजही खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिंदे गटाला हे कार्यालय कोणत्या अधिकारात दिले जात आहे, असा सवाल दानवे यांनी यावेळी केला. दुसऱ्या गटाला एखादे कार्यालय द्यायचे किंवा नाही याचा निर्णय तुम्ही घ्या पण आमच्या कार्यालयाला धक्का लावू नका, असा दमही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना भरला.

आधीच येऊन बसला गट

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटही या कार्यालयासाठी आग्रही असल्यामुळे हा वाद चांगलाच ताणला गेला. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपुरात पोहचताच हे कार्यालय शिंदे गटाला दिले गेले.

फोटो हटले, फोटो लागले

शिवसेनेच्या कार्यालयात ठाकरे गट आधीच पोहचला. तेथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. पण हे कार्यालय शिंदे गटाला मिळताच ते फोटो हटवून शिंदे गटाने तेथे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला. अखेर ठाकरे गटाला राष्ट्रवादी कार्यालयामागील कार्यालय देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...