आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयावर शिंदे गटाचा कब्‍जा:शिवसेना कार्यालयात शिंदे गट;  उद्धव, आदित्यचे फोटो हटवले

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान भवनातील शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयावर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने कब्जा केला. शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेताना शिंदे गटाने कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे हटवली. शिंदे आणि ठाकरे गटात कार्यालयावरून वाद निर्माण होऊ नये म्हणून विधान मंडळाने ठाकरे गटाला पर्यायी जागा करून दिली आहे.

शिंदे गटाने मुंबई विधानभवनातील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी वाद नको म्हणून विधिमंडळाने शिवसेना विधिमंडळ पक्षाचे कार्यालय कुलूपबंद केले होते. हा अनुभव लक्षात घेऊन शिंदे गटाने नागपूर विधानभवनातील कार्यालय आपल्या ताब्यात घेतल्याने वातावरण तापले होते.

बातम्या आणखी आहेत...