आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिक आणि शिंदे गटातील राडा प्रकरण:गणपती बाप्पा ओरिजनल अन् डुप्लिकेट कोण हे पाहत नाही - कृषीमंत्री अब्दुल सत्तार

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती हा सगळ्यांचे आहे, तो काही ओरिजनल कोण आणि डुप्लिकेट कोण हे पाहत नाही. जे मानतात त्यांचे गणपती बाप्पा आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली. गणेशोत्सवात ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेनेत राडा झाला. त्यावर विचारले असता ते बोलत होते.

प्रभादेवी आणि दादर परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली होती. यानंतर शिवसेनेचे मुंबईतील बडे नेते सक्रिय झाले होते. हे सर्वजण रविवारी सकाळपासून दादर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. यावेळी अरविंद सावंत यांनी सदा सरवणकर यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. सदा सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलातून राडा झाला त्याठिकाणी आणि पोलिस स्टेशनच्या परिसरात अशा दोन ठिकाणी फायरिंग केले होेते. याविषयी विचारले असता सत्तार यांनी गणपती महाराज सर्वांचे असल्याचे सांगितले.

सगळेच गणपती उत्सव साजरा करतात हा वादाचा विषय नाही. दोन राजकीय गट वेगवेगळे एकत्र आले की काही असा राडा दिसतो, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी हिंदू सणाचा विचार करून त्यात शिथिलता आणली व जल्लोषात साजरा करण्याची परवानगी दिली. सरकारकडून जे मदत पाहिजे ती केली. हे राजकारण आहे. राजकारणामध्ये राज करण्यासाठी कारणे शोधावी लागतात. मात्र हा छोटासा वाद असून तेवढ्या पुरता आहे. तो महाराष्ट्रात पसरण्याचा काही प्रश्न नाही असे सत्तार यांनी सांगितले. गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला याचा आनंद आहे. याचा वेगळा अर्थ लावू नये.

मुंबईतील एका कार्यक्रमात सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री एका व्यासपीठावर आले. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली होती. त्याविषयी बोलताना जयंत पाटलांना आता फक्त विरोधी पक्षाची भूमिका करायची आहे अशी टीका केली. सरन्यायाधीश आपल्या राज्याचे झालेले आहे. त्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमाला जाणेही महत्त्वाचे आहे. त्यांचा सन्मान महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमात गेले त्यात काही वावगे नाही. त्यावर विवाद करणे हे बालिशपणाच आहे.

चुकीचा अर्थ काढणे अयोग्य​

मी जयंत पाटील यांच्याबद्दल बोलावे एवढा मोठा पुढारी नाही. मात्र आपल्या राज्यातील माणूस एवढ्या मोठा पदावर बसला असताना त्यांच्या सन्मानासाठी जाण्याचा वेगळा अर्थ काढणे योग्य नाही. याचे योग्य उत्तर मुख्यमंत्री देतील.

बातम्या आणखी आहेत...