आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामजन्मभूमीच्या आंदोलनानंतर अयोध्येत राम मंदिर साकारत आहे. एक स्वप्नपूर्ती झाली आहे. त्या नंतर संघ कोणत्या आंदोलनात उतरलेला नाही. आता ज्ञानवापीचा मुद्दा समोर आला आहे. काही स्थानांबद्दल आस्था वा श्रद्धा असू शकतात. पण, यापुढे प्रत्येकच मशिदीत शिवलिंग दिसायला नको असा सबुरीचा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे दिला.
तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात आज ते बोलत होते. रेशिमबाग मैदानात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. भाग्यनगर (हैद्राबाद) येथील श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष दाजी उपाख्य कमलेशजी पटेल मुख्य अतिथी होते.
ज्ञानवापीबद्दल दोन्ही पक्षांनी समन्वय आणि सुसंवादाने व सामंजस्याने मार्ग काढायला हवा होता. पण, काहींनी पटत नाही ते न्यायालयात धाव घेतात. मग निदान न्यायालयाच्या निकालाचा आदर आणि पालन करायला हवे. संविधानावर आधारित न्यायालयाच्या निर्णयावरही अनुचित टीका व्हायला नको, असे सरसंघचालक म्हणाले.
हिंदू मुस्लिमांच्या विरोधात विचार करीत नाही. यापुढे रोज एक नवीन प्रकरण काढायला नको. आम्हाला कोणाच्याही पूजेचा विरोध नाही. आपल्या देशात यहुदी व पारसी या शरणार्थीच्या उपासना आल्या. आक्रमक मुस्लिमांची उपासना आली. आपले नाते मुस्लिम आक्रमकांशी नाही तर येथील मुस्लिमांशी आहे, असे भागवत म्हणाले.
भारताबाहेरून हल्ला केलेले मूळ आक्रमक सोडून धर्मांतरित मुस्लिमांचे सगळ्यांचे पूर्वज हिंदु होते, हे लक्षात घेतले पाहिजे. आक्रमक सोडून सगळ्या मुुस्लिमांचे वंशज एकच आहे. हसन खाँ मेवाती, अशफाकउल्लाखान यांनी देशासाठी बलिदान दिले, हे आम्ही विसरू शकत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.