आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती, शिवतीर्थ महालतर्फे रविवार 12 जून रोजी शानदार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तरीही सोमवार 6 जून रोजी तारखेनुसार सकाळी ७ वाजता शिवतीर्थ, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, महाल येथे श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा परंपरागत पद्धतीने साजरा करण्यात आला.
6 जून 1674 ला महाराजांचा राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक करण्यात आला होता. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली होती. तेव्हापासून राज्यात 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा रायगडावर साजरा होतो. तर संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटना शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. त्याच प्रमाणे नागपुरातही समितीतर्फे साजरा करण्यात आल्याचे संयोजक दत्ता शिर्के यांनी सांगितले.
यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पंचामृताने दुग्धाभिषेक करण्यात येऊन माल्यार्पण करण्यात आले. त्या नंतर आरती करण्यात येऊन जगदंब ढोलताशा पथकाने मानवंदना दिली. यावेळी सुभेदार आखाडाने शिवकालीन क्रिडा प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाला शिरीषराजे शिर्के, डॉ. शरद सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रितेश बडवाईक, दीपक ठाकरे, जय आसकर, आशिष चौधरी, सुमीत भोयर, पंकज धुर्वे, मकरंद काळे, अक्षय ठाकरे, भावेश माशीदकर आदींसह शेकडो कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले. संयोजक दत्ता शिर्के यांच्यासह शेकडो शिवप्रेमी या उत्सवात सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.