आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकेला प्रत्युत्तर:आम्ही अत्यंत सौम्य भाषेचा वापर केलाय, ज्यांना या भाषेविषयी शंका आहे त्यांनी मराठी डिक्शनरी पाहावी; राऊतांचा विरोधकांना सल्ला

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील वातावरण सध्या तापलेले दिसत आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची फैरी या सुरुच आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी अनेक वेळा अपशब्दांचा वापर केला आहे. यानंतर भाजपने संजय राऊतांच्या भाषेवरुन त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आता भाजपच्या आरोपांवर आता संजय राऊतांनी आहे.

संजय राऊत त्यांच्या भाषेविषयी होणाऱ्या टीकेवर बोलताना म्हणाले की, 'महाराष्ट्रामध्ये एखादा पक्ष राज्याची सतत बदनामी करत असेल किंवा थुंकत असेल तर त्याची आरती करावी, असे ज्यांना वाटते त्यांनी खुशाल त्यांची आरती करावी. मात्र आम्ही अत्यंत सौम्य भाषेचा वापर केला आहे. तसेच ज्यांना या भाषेविषयी शंका आहे. त्यांनी आपली मराठी डिक्शनरी पाहावी किंवा साधुसंतांची पुस्तक वाचावी' असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.

पुढे राऊत म्हणाले की, 'तसेच महाराष्ट्रातील लोकांना कुणीही मराठी शिकवू नये. चांगल्या कामासाठी किंवा देशाच्या विकासासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र येऊन काम करणार असेल, तर लोकशाहीमध्ये नक्कीच त्याचे स्वागत व्हायला पाहिजे. मात्र काही लोकांना या देशाच्या लोकशाहीचा अर्थ समजलेला दिसत नाही' असे देखील राऊत म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे संजय राऊतांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यावर संजय राऊतांनी देखील मोर्चा हाती घेत सोमय्यांविरोधात विविध आरोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना दोन-तीन वेळा किरीट सोमय्यांना शिवी दिली होती. यावरून किरीट सोमय्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त करत ही भाषा योग्य नसल्याचे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...