आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्यांनी स्वत:ची ओळख काकांच्या नावाने प्रस्थापित केली आहे, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोण ओळखते असा सवाल उपस्थित करू नये. असा टोला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला आहे.
श्रीकांत शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, 5, सहा दिवसांपूर्वी अजित पवारांना वाटले की, आता मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो, ते तसे वागत होते. पण परत काकांनी पहाटेची पुनरावृत्ती केली, आणि आता ‘काका मला वाचवा’असे म्हणण्याची वेळ अजित पवारांवर आली आहे. हे आम्हाला शिकवणार असा चिमटा श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांना काढला आहे. शिवसेनेच्या पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा मंगळवारी नागपुरात पार पडला. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागले आहे.
नेमके काय म्हणाले शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केवळ बॅनर लावल्याने कुणी भावी मुख्यमंत्री होत नाही. यांनी पहाटेचा प्रयत्न केला पण जमले नाही. एकनाथ शिंदे यांना ते करुन दाखवले याचे शल्य त्यांचया मनात आहे. म्हणून त्यांनी ही टीका केली असावी असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. तर दुसऱ्यादा प्रयत्न केला असता पुन्हा काकांनी हवा काढून घेतली. आज तुम्ही दुसऱ्या राज्यात जावून पहा, तुम्हाला किती लोक ओळखतात, असा सवाल करत सारा शहर अब मुझे काका के नाम से जानता है असा डायलॉग मारत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला होता.
अजित पवारांचे वक्तव्य काय?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला होता. अजित पवार म्हणाले की, काहीही झाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात त्यांच्या गावी येऊन दोन तीन दिवस राहतात. काय करतात तर शेती करतोय. स्ट्रॉबेरी पाहून कधी शेती होती का ? असा खोचक सवाल अजित पवारांनी केला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.