आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा प्रादुर्भाव:चार दिवसात वर्ध्यात सहा रुग्ण पॉझिटिव्ह ; आरोग्य विभागाची कसरत

वर्धा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात बाहेर गावावरुन येत असलेल्यांची संख्या वाढत असून, त्यात रुग्णांची भर पडत आहे. अशातच वर्ध्यात चार दिवसात सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबई येथून सासरकडील मंडळींना भेटण्यासाठी दिनांक २४ जून रोजी सुदामपुरी येथे तिघे जण आले असता,त्यामधील ४० वर्षीय व्यक्तीची तब्येत ठीक नसल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. स्त्राव घेत तपासणी करिता पाठविण्यात आला असता,दिनांक २५ जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला तर निकटवर्तीयांचा अहवाल निगेटिव्ह आला आहेत.

दिनांक २५ जून रोजी अमरावती येथील ३५ वर्षीय युवक हा गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे तो सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला असता,त्याचा स्त्राव घेत तपासणी करिता पाठविण्यात आला असल्याने दिनांक २६ जून रोजी त्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती देण्यात आली. त्याच बरोबर आर्वी येथील जाजुवाडी परिसरात राहणारी २९ वर्षीय महिला ही विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमा करिता बुलडाणा व अमरावती येथे गेली असता दिनांक १७ जून गावी आली होती. दिनांक २५ जून रोजी डोकेदुखी वाढत असल्यामुळे महिलेचा स्त्राव घेत सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आला होता. दिनांक २७ जून रोजी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने,२९ वर्षीय महिलेला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथील बजाज कंपनी मध्ये कोरोनाचा पादुर्भाव वाढल्याने,अनेक काम करणारे कामगार परतीचा प्रवास करीत आहे.याच कंपनी मधील आर्वी तालुक्यातील मदना येथील युवक व वर्धेतील समता नगर परिसरात राहणारा युवक हे दोघेही २२ ते २५ वर्षीय वयोगटातील असून,ते जिल्ह्यात दाखल होताच आरोग्य विभागाने त्या दोघांना रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते.

पुलगाव येथील गांधी चौक वार्ड क्रमांक ७ या परिसरात राहणारे ६४ वर्षीय वृद्ध इतर जिल्ह्यांमधून प्रवास करुन आले असून,त्यांची प्रकृती बिघडली असल्याने, उपचारार्थ सावंगी मेघे रुग्णालयात दाखल झाले होते. या तिघांचा अहवाल दिनांक २८ जून रोजी पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती अजय डवले यांनी दिली आहे. जिल्ह्यात चार दिवासात मुंबई, औरंगाबाद, अमरावती व आर्वी येथील रुग्ण आढळून आले असल्याने, सहा रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत १८ रुग्णांची नोंद करण्यात आली असून,११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहेत,तर ६ रुग्ण उपचार घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...