आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मॅनहोल्सची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी कामगारांनी मॅनहोल्समध्ये प्रवेश न करता ते सुरक्षितपणे स्वच्छ करता यावे यासाठी नागपूर स्मार्ट सिटीतर्फे रोबोट खरेदी करण्यात येणार आहे. नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ऑनलाईन माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये स्मार्ट सिटीचे मेंटॉर आणि चेअरमन डॉ. संजय मुखर्जी मुंबईहुन उपस्थित होते. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी, संचालक मंडळ सदस्य अनिरुद्ध शेनवाई, आशिष मुकीम, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, कंपनी सेक्रेटरी श्रीमती भानुप्रिया ठाकूर आणि मुख्य वित्त अधिकारी श्रीमती नेहा झा उपस्थित होते.
सध्या केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेकडे 10 जेटींग मशीन आणि 4 सक्शन मशीन आहेत त्याच्या सहाय्याने मोठ्या रोडवर सिवर चेंबरची स्वच्छता करण्यास मदत होते. पण लहान रोडवर हे करणे अडचणीचे ठरते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत होणार आहे. आई.ओ.टी. वर आधारित हे स्कॅव्हेंजिंग रोबोट लहान रस्त्यावर किंवा गल्ल्यांमध्ये सुद्धा सिवर चेम्बरच्या स्वच्छेतेत मदत करील.
याशिवाय नागपूर स्मार्ट सिटीतर्फे हुडकेश्वर-नरसाळा भागात पोहरा नदीवर 20 एम.एल.डी. क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता प्रदान केली आहे. या माध्यमातून पोहरा नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या प्रयत्न आहे, असे गोतमारे यांनी सांगितले. नागपुरात ई टाॅयलेट उभारण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.