आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापूर्व नागपुरातील 1700 एकरात साकारण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा विकास रखडल्याने टीका होत आहे. त्यातच स्मार्ट सिटी प्रकल्पातील काही प्रकल्प स्थगित केले असून काहींचे कार्य प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीतून ही बाब उघडकीस आली आहे.
1730 एकरात स्मार्ट सिटी प्रकल्प
पूर्व नागपुरातील भरतवाडा, पूनापूर, पारडी व भांडेवाडीच्या काही भागातील एकूण 1730 एकरात स्मार्ट सिटी प्रकल्प साकारण्यात येत आहे. 53 किलोमीटरचे रस्ते तयार होत असून यात 24 व 30 मीटर रुंदीच्या रस्त्यांचा समावेश आहे. फुटपाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला ड्रेनेज, सिवेज लाइन, जलवाहिन्यांचे जाळे परसवण्यात येत आहे. यात गृह प्रकल्पाचाही समावेश आहे. आतापर्यंत प्रकल्पावर 418 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
महसूल वाढीसाठी चाचपणी सुरू
महापालिकेचा विशेष प्रकल्प असलेल्या नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएसएससीडीसीएल) आता स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून महसूल वाढीसाठी चाचपणी सुरू केली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात मंजूर 64 पदांपैकी 35 भरती करण्यात आली असून 21 रिक्त आहे. तर 8 पदांबाबत उच्चन्यायालयात प्रकरणे दाखल आहे.
177 कोटी रुपयांचा खर्च
माहिती अधिकारात देण्यात आलेल्या माहितीत पब्लिक मार्केट प्लेसेस, निर्मल नाग नदी,अॅटोमेटेड पारडी या योजना स्थगित केल्या आहे. झिरो गारबेज सोसायटी, स्मार्ट ट्रॅश बिन योजनांचे कार्य अजूनही प्रगतीपथावरच आहे. नागरी उद्याने आणि लॅण्डस्केपिंग प्रकल्पाची आता कुठे निविदा निघालेली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे काम 9 एप्रिल 2020 रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. आता 30 जून 2022 पर्यत मुदत वाढ दिली आहे.
परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प 8 सप्टेंबर 2020 रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. आता 31 मार्च 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रकल्पावर आतापर्यत 177 कोटी तर परवडणारी घरे प्रकल्पावर 17 कोटी खर्च झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.