आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डॉ. शीतल आमटे यांचे पार्थिव चंद्रपुरात पोस्टमार्टमसाठी दाखल झाले आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम होणार आहे. आज सकाळी त्यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले होते.
शीतल आमटे या बाबा आमटे यांची नात आणि विकास आमटे यांची कन्या आहे. संपूर्ण आनंदवनाची जबाबदारी शीतल आमटे यांच्यावर होती. बाबा आमटेंच्या तिसऱ्या पिढीचे त्या नेतृत्व करत होत्या. शीतल आमटे काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत वाद पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावर आला. शीतल यांच्यामुळे वाद होत असल्याचा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.