आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाहुणचारानंतर जावयाने सासूच्याच घरी घरफोडी केल्याची घटना चंद्रपूर येथे घडली. जावयाच्या या कृत्याने सासूला चांगलाच धक्का बसला आहे. या अट्टल जावयाचे नाव पृथ्वी अशोक तायडे असे आहे. त्याला दिर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.
दुर्गापुरातील वार्ड क्रमांक ३ मध्ये राहणाऱ्या गंगा विजयकर यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार दुर्गापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. विजयकर यांचा घरून सोन्याचे दागिने, एकूण १ लाख ३७ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. त्यानंतर दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुर्गापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने, सुनील गौरकार, मनोहर जाधव व सूरज लाटकर यांनी तपास सुरू केला. घरच्यांची विचारपूस केली. मात्र घरात संशयास्पद असे कोणीच आढळले नाही.
एक जावई फक्त आले होते. ते चोरी कसे करू शकतील. हा प्रश्न सासुबाईसमोर उभा ठाकला. मात्र, पोलिसांची संशयाची सुई त्यांच्यावरच होती. चौकशी केली असता जावयाने थातुरमातूर उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच बळावला. अखेर पोलीसी खाक्या दाखवताच पृथ्वी तायडे पोपटासारखा बोलू लागला. आरोपी हा कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील आहे. त्याचे लग्न गंगा विजयकर यांच्या मुलीशी झाले होते. जावयाने आपणच ही घरफोडी केल्याचे कबुल केले आणि सासूबाईला मोठा धक्का बसला. या चोरट्या जावयाला अटक करण्यात आली. व त्याच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावर पोलिसांनी भादवी कलम ३८० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.