आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुनगंटीवारांचा राऊतांना टोला:गृहखात्यासाठी शिवसेनकडूनच कालचा हल्ला झाला नसावा ना? सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली शंका

चंद्रपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्वर ओक हल्ल्याप्रकरणी राज्यातील सत्ताधार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर संजयस राऊत यांनी आज सकाळी या आंदोलनाप्रकरणी थेट भाजपकडे इशारा केला आहे. यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गृहखाते आणि गृहखात्याच्या भूमिकेवरून सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यावरूनही मुनगंटीवारांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. शिवसेनेला गृहखाते हवे आहे, वळसे पाटील यांच्याकडून गृह खाते काढून सूडाचे राजकारण करण्यासाठी म्हणून हल्ला झाला नसावा ना? अशी शंका सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

नेमके काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात असे हल्ले होत असतील, तर चिंतन गरजेचे आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर यासोबतच पुढच्याच आठवड्यात विशेष अधिवेशन बोलावा, आणि कोणाच्याही घरावर आंदोलने, निदर्शने, हल्ले करता येणार नाही, यासाठी कायदा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. तर शिवसेनेला गृहखाते हवे आहे, वळसे पाटील यांच्याकडून गृह खाते काढून सूडाचे राजकारण करण्यासाठी म्हणून हल्ला झाला नसावा ना? अशी शंका सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांना माहिती कशी नव्हती - अजित पवार
सिल्वर ओक हल्ला प्रकरणाचरी माहिती पत्रकारांना होती, मात्र पोलिसांना नाही असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राष्ट्रवादीकडे गृहखाते असताना पवारांनी उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.