आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर : वडेट्टीवार, मुंबईतही लोकलच्या सध्याच्या फेऱ्या कमी करण्याचा विचार

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तसेच मुंबईत लोकलच्या फेऱ्याही कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

काेरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. उपाययोजना सुरू असल्या तरी त्याचा रिझल्ट काय येईल, हे आज सांगता येत नाही. तरी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे असे आपल्याला म्हणता येईल, असे सूचक वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले.

विदर्भात लॉकडाऊनचा पर्याय तपासणार
विदर्भात लॉकडाऊन परवडणार नाही. रोजगाराचा प्रश्न आहे. त्यामुळे विदर्भातील पालकमंत्र्यांशी चर्चा करून काय पर्यायी निर्णय घेता येईल, याचा विचार करण्यात येणार आहे. सिनेमागृहांवर पूर्णत: बंदी घालण्याचाही आमचा विचार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...