आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टेमसेल थेरपीच्या नावाने करण्यात येणाऱ्या व्यवसायाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. ही फसवणूक आहे, असे परखड मत मेडिकल जेनेटिक्सच्या प्रणेत्या डाॅ. शुभा फडके यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. स्टेमसेल थेरपीच्या नावाखाली अनेक डाॅक्टर व्यवसाय करत महागडे उपचार करतात. त्यात सामान्य रुग्णांची लूट होते असेही डाॅ. फडके यांनी या वेळी बोलताना सांगितले आहे.
फडके म्हणाल्या, बाळाची नाळ जतन करून ठेवण्यात येते. २० ते २५ हजार घेऊन नाळ जतन करून ठेवण्यात येते. त्यामुळे अनेक आजारांवर उपचार केले जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, अशा चुकीच्या जाहिरातींमुळे लोकांची फसवणूक होते. वास्तविक पाहाता नाळेमुळे कोणत्याही आजाराचा उपचार होऊ शकत नाही, असे डाॅ. फडके यांनी सांगितले. महागडे जेनेटिक्स उपचार भारतात परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला विनंती केली असल्याचे डाॅ. फडके यांनी सांगितले. आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे बाळामध्ये जन्मत: दोष राहू शकतो. त्याचे प्रमाण प्रसंगी वाढूही शकते असे डाॅ. फडके यांनी सांगितले. अमेरिका व युरोपच्या तुलनेत भारतात संशोधनासाठी निधी कमी मिळत असला तरी तांत्रिकदृष्ट्या आपण खूप सरस आहोत असे डाॅ. फडके यांनी स्पष्ट केले. अनेक दुर्धर आजारांचे उपचार खूप महागडे आहेत. नॅशनल हेल्थ पाॅलिसी अंतर्गत ते परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात यावेत यासाठी केंद्राला विनंती केली आहे. खासगी डाॅक्टरांनीही कंपनीच्या प्रतिनिधींचे न ऐकता स्वत: प्रशिक्षण घेऊन रुग्णांना मार्गदर्शन केल्यास रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध होऊ शकतात, असेही डॉ. फडके यांनी सांगितले. दरम्यान, आता या प्रकरणावर डॉक्टरांचे काय म्हणणे ते पहावे लागेल.
कोणत्या आजारासाठी टेस्टची मर्यादा ठरली पाहिजे आपले मुल अव्यंग आणि निरोगी जन्माला यावे म्हणून बहुतांश आई, वडील जेनेटिक टेस्ट करतात. एका मर्यादेपर्यंत हे ठीक आहे. पण आता याचीही मर्यादा ठरली पाहिजे. कोणी कशासाठी आणि कोणत्या आजारासाठी टेस्ट करावी याचीही मर्यादा ठरली पाहिजे, असे डाॅ. फडके यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.