आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडदा:वादाचा विषय तुम्हीच थांबवा; आमदार बच्चू कडूंनी फोडले माध्यमांवर खापर

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आ. बच्चू कडू आणि आ. रवी राणा यांच्यात गेले आठ दिवस खोक्यांवरून सुरू असलेल्या वादाचे खापर बच्चू कडू शेवटी माध्यमांवर फोडून मोकळे झाले आहेत. आठ दिवसांपासून तेच ते सुरू आहे. त्यामुळे माध्यमांनी हा विषय थांबवावा, अशी विनंती आ. बच्चू कडू यांनी येथे नागपूर येथे माध्यमांशी बोलताना केली. मुंबईला जाण्यासाठी ते विमानतळावर आले होते.

बच्चू कडू म्हणाले की, आधी तर मला माध्यमांना सांगायचे आहे की, आता हा विषय तुम्ही थांबवा. आमच्याकडून थांबवणे नाही झाले, तरी माध्यमांनी मात्र हा विषय थांबवला पाहिजे. अमरावती येथे आयोजित सभेत मी कुठेही वाईट वक्तव्य केले नाही. सार्वजनिक आणि सामान्य माणसांसाठी बोललो. ते माध्यमांनी का दाखवले नाही, असा उलट सवाल बच्चू कडू यांनी केला. आम्ही प्रत्येक तालुक्यात एक शाळा दत्तक घेऊन आदर्श निर्माण करणार आहोतत. आ. रवी राणांचे आभारही मानले. ते दोन पावले मागे गेले, तर मी चार पावले माघार घेईन, असेही म्हणालो. पण, चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी मिळत नाही आणि वाईट गोष्टींना लगेच दाखवल्या जातात, असे कडू म्हणाले.

त्या दोघांनी एकत्र येऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावावेत आ. राणा आणि आ. बच्चू कडू यांच्यात काही दिवसांपासून मतभेद असल्याचे अमरावती जिल्ह्यातील लोकांनी पाहिले. मी दोघांना अमरावतीची खासदार म्हणून विनंती करेन की, गेल्या अडीच वर्षात जिल्ह्याचे नुकसान झाले. आता राज्याला सक्षम सरकार मिळाले आहे. आपल्या पाठीशी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत. मी विनंती करेन की आपण एकत्र यायला हवे. लोकांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत, लोकांना न्याय देण्यासाठी या दोघांनी एकत्र यावे, असे व्हिडिओमध्ये खा. नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

माझ्या मतदारसंघात २० हजार एकर सिंचनाखाली येणार माझ्या मतदारसंघातील सापन प्रकल्पाला सुप्रमा दिली आहे. त्यामुळे २० हजार एकर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. आता चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणार असल्याचे कडू यांनी सांगितले. अशा वादात लोकांचे प्रश्न मागे पडण्याचा प्रश्नच येत नाही. कारण लोकांचे प्रश्न मार्गी लागतच आहेत. ती काय माझी एकट्याची जमीन आहे का, असा सवाल कडू यांनी केला. मी काय लहान मुलगा आहे का, माझेही वय ५१ झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे यापुढे वादाचा विषय काढणार नाही. आम्ही १ तारखेपर्यंत मागितलेले पुरावे आले नाही. त्यामुळे वादाचा विषय संपला आहे. राणा तलवार घेऊन आले तर मी फुले घेऊन जाईन, असे कडू यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस जे सांगतात तेच आम्ही करतो : नवनीत मुंबईला जाण्यासाठी नागपूर विमानतळावर आल्या असता खा. नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मी घरी आमदार रवीजींची पत्नी आहे अन् बाहेर लोकसेवक आहे. मुंबईला फडणवीस यांना भेटायला जात आहात का? त्यावर त्या म्हणाल्या की, मुंबई माझे घर आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. ते जे सांगतात तेच आम्ही करतो. ‘रवी राणा आणि बच्चू कडू हे दोघेही माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. माझ्यापेक्षा त्यांना राजकारण अधिक कळते. मी माझ्या कामावर लक्ष देते. कारण माझी कामे माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहेत. त्या दाेघांच्या वादाशी माझा संबंध नाही, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

बातम्या आणखी आहेत...