आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलेबाजी:स्वत:चा पक्ष न सांभाळता येणाऱ्यांनी राजकारण सोडून द्यावे - सुधीर मुनगंटीवारांचा संजय राऊतांना जोरदार टोला

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा प्लान होता, असा आरोप ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून केला होता. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार उत्तर दिले. पक्ष फोडण्याचा डावच होता तर डाव होऊ देऊ नका. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस फुटत आहे. जे नेते आपला पक्ष सांभाळू शकत नाही. आमदारांना सांभाळू शकत नाही ते नेते लायकीचे नसून त्यांनी राजकारण सोडून द्यावे, असा घणाघात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज गोंदिया येथे केला.

सुधीर मुनगंटीवार हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माहीत असेल. हे शरद पवारांनी म्हटले होते. यावर मुनगंटीवार म्हणाले, जर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आधीच माहित होत असेल तर कशाला पैसे खर्च करायचे? कोणीही व्यक्ती असा दावा करीत असेल तर आश्चर्य आहे.

ते शिवसेनेचे पॅम्प्लेट

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सामना हे वृत्तपत्र नसून शिवसेनेचे पॅम्प्लेट आहे. सामना हे जर वृत्तपत्र असते तर त्यांच्यामध्ये सामान्यांचे प्रश्न आले असते. बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे खासदार शरद पवार यांची मुंबईमध्ये येऊन भेट घेणार आहेत. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करत त्यांना स्वतःचे राज्य सांभाळत नाही. त्यांच्या राज्याचा प्रगतीचा वेग अजूनही कमी आहे, यांना मोदी नको आहेत. यांना स्वैराचारी सत्ता पाहिजे.